भगीरथी मुळ शितल हिमाचल वासी । नलगत पल खलदुर्जन संहारी त्यासी । तो हा हिम केदार करवीरा पाशी । रत्नागिरीवर शोभे कैवल्य राशी । जयदेव जयदेव जय जय श्री केदारा । दासा संकटवारा भव भय निवारा ।।१।। उत्तरेचा देव दक्षिणी आला । दक्षिण केदार नाम पावला । रत्नासूर मर्दूनी भक्ता पावला । दास म्हणे थोर भाग्या लाभला । जयदेव जयदेव जय जय श्री केदारा । दासा संकटवारा भव भय निवारा ।।२।।